साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक; १५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड

७४ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण; गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना दरमहा १००० रुपयांची शिष्यवृत्ती

 

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.) परीक्षेत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेरने यंदा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेतील ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातून १५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने घेतली जाणारी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा १००० रुपये प्रमाणे एकूण ४८,००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील व शिक्षक डी. ए. धनगर यांचे मार्गदर्शन लाभले, तर मुस्ताक शेख व शुभम निकम यांनी तांत्रिक सहकार्य केले. तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलची विद्यार्थिनी संजना ज्ञानेश्वर अहिरे हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून तिला मुख्याध्यापिका अनिता बोरसे व शिक्षिका मनीषा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार सोहळा विद्यालयात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, संचालक गुणवंत पाटील, भास्करराव बोरसे, किरण पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी परीक्षेचे महत्त्व व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात घोरपडे सरांनी शिष्यवृत्तीचा उपयोग शिक्षणासाठीच करावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डी. वाय. पाटील यांनी केले.

 

निवड झालेले विद्यार्थी

 

मोहित रमेश पाटील, शिवम मनोहर पाटील, विराज दीपक पाटील, गोपाल किशोर शिंदे, दीपांशू योगेश पाटील, पियुष अरुण शिंदे, शिवम देविदास पाटील, ललित सुनील ठाकरे, चाणक्य प्रशांत पाटील, मनन राकेश पाटील, नरेश चंद्रकांत महाजन, पुष्कर विनोद शिंदे, हर्षल प्रदीप सोनवणे, भार्गव महेंद्र पाटील, पूरब राजू खंगार.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *