स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या चेअरमनपदी भगवान पाटील, उपाध्यक्षपदी पन्नालाल मावळे बिनविरोध

अमळनेर (प्रतिनिधी) स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित, जळगाव जिल्हा यांच्या चेअरमनपदी पारोळा येथील भगवान गंगाराम पाटील तर उपाध्यक्ष (व्हाइस चेअरमन) पदी अमळनेर येथील पन्नालाल जोगीलाल मावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दि. २५ जून २०२६ रोजी जळगाव येथील आंबेडकर मार्केटमधील फेडरेशनच्या कार्यालयात चेअरमन व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सहकार विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नवनिर्वाचित संचालकांना नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणुकीचे वेळापत्रक तसेच अटी व शर्तींची सविस्तर माहिती देण्यात आली. सर्व उपस्थित संचालकांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेत भगवान गंगाराम पाटील यांची चेअरमनपदासाठी तर पन्नालाल जोगीलाल मावळे यांची उपाध्यक्षपदासाठी सर्वानुमते निवड केली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र तायडे यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी फेडरेशनचे सचिव जगदीश पांडुरंग बोरसे यांच्यासह जयंतलाल वानखेडे, शंकरराव साळुंके, जितेंद्र जाधव, डॉ. निलेश पाटील, हरीश विसावे, गिरीश बऱ्हाटे, अरुण जगताप आणि ललिता पाटील हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक तथा माजी चेअरमन युवराज वाघ यांच्या हस्ते नवनियुक्त चेअरमन, उपाध्यक्ष आणि सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी जगदीश पांडुरंग बोरसे आणि युवराज वाघ यांनी मोलाचे परिश्रम घेतले. आभार हरीश विसावे यांनी मानले. दरम्यान, निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी चेअरमन, उपाध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *