पत्रकार संघ व तेरापंथ युवक परिषदेतर्फे आज दोन ठिकाणी रक्तदान शिबिर, रक्तदात्याला आकर्षक ट्रॉली बॅग भेट

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आयोजित आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद प्रस्तुत, आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या प्रेरणेने अमळनेर शहरात आज १७ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात येत आहे.

“रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद…” तसेच “थेंब तुमचा, जीवन त्यांचे – रक्तदान ही सर्वोत्तम सेवा… मानवतेचा खरा उत्सव” या संदेशांसह आयोजित करण्यात आलेले हे शिबिर तेरापंथ भवन, न्यू प्लॉट, अमळनेर तसेच प्रताप कॉलेज व इच्छादेवी चौक, अमळनेर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर भेट म्हणून आकर्षक ट्रॉली बॅग देण्यात येणार आहे. “रक्तदान करा… आयुष्य भेट घ्या… एक छोटी कृती, मोठा फरक!” या भावनेतून सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज, उज्ज्वल भविष्य आणि नवीन जीवनाचा संदेश देण्यात येत आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आणि तेरापंथ युवक परिषद, अमळनेर यांच्यासह शिबिराचे सहयोगी रोटरी क्लब अमळनेर, रोट्रॅक्ट क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, जैन सोशल ग्रुप आणि जय बजरंग व्यायामशाळा, अमळनेर यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *