दहावी व बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घ्या; अमळनेर क्लासेस संघटनेचे शिक्षण विभागाला निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) दहावी व बारावी बोर्ड परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, या मागणीसाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (पी टी ए) तर्फे ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.

हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी क्लासेस संघटना पी टी ए चे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे, सुनील पाटील आदी पी टी ए पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की  मागील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गुणफुगवटा होत असून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. परीक्षा हॉलमध्ये कॉपीमुक्त वातावरण नसेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पी टी ए संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून, परीक्षांमध्ये प्रामाणिकता टिकवून ठेवण्यासाठी कठोर दक्षता घ्यावी व मुक्त कॉपीला आळा बसावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *