अमळनेर शहर मुस्लिम समाज व AIMIM तर्फे पोलीस स्टेशनला निवेदन; कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)  सोशल मीडियावरील एका मुलाखतीत नाजिया ईलाही यांनी इस्लाम धर्म, पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, अशी कथित आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करत अमळनेर शहर मुस्लिम समाज आणि AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) यांच्या वतीने अमळनेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित महिलेने सोशल मीडियावरील मुलाखतीदरम्यान इस्लाम धर्म व पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधाने केली असून त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी AIMIM अमळनेर शहराध्यक्ष सईद शेख, अल्तमश शेख, हाजी दबीर पठाण, गुलामनबी पठाण, इमरान शेख, दानिश शेख, रिझवान मनियार, हाफिज तौसीफ रझा, हाफिज मुस्तफा रझा, मोहतशिम मुबल्लिग, नईम एफ. पठाण, असलम सर, इब्राहिम सर, मुश्ताक सर, जमाल शेख, इमरान भाया यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

निवेदन स्वीकारल्यानंतर संबंधित प्रकरणात कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी उपस्थितांनी प्रशासनाकडे केली.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *