
अपडाऊन ग्रुपतर्फे सप्तशृंगी गडावर भाविकांना लस्सी व ताक वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) : सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने अपडाऊन ग्रुपतर्फे राबविण्यात आलेला थंड लस्सी व मसाला ताक वाटपाचा उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमात मोठ्या संख्येने भाविकांना थंड पेयांचे वाटप करण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेत गड चढणाऱ्या भाविकांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरला. ग्रुपमधील सदस्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नियोजन, साहित्य व्यवस्था आणि वितरणाचे काम पार पाडले.
या सेवाभावी कार्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही अशा सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प अपडाऊन ग्रुपने व्यक्त केला असून, यासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply