अमळनेर श्रीराम नवमी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजय महाजन; उपाध्यक्षपदी मनोज ठाकरे यांची निवड

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रीराम नवमी उत्सव समिती २०२६ च्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीच्या अध्यक्षपदी विजय महाजन (रॉयल शेतकरी) तर उपाध्यक्षपदी मनोज भाऊ ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. आगामी श्रीराम नवमी उत्सव शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात साजरा करण्यासाठी तरुण व कार्यक्षम नेतृत्व म्हणून विजय महाजन व मनोज ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमळनेर शहरातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे श्रीराम भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवड जाहीर होताच शहरातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, नवनियुक्त अध्यक्ष विजय महाजन व उपाध्यक्ष मनोज ठाकरे यांनी संस्थापक अध्यक्षांचे आभार मानत, “यावर्षीचा श्रीराम नवमी उत्सव अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नियोजन करण्यात येईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *