
फागन महोत्सवनिमित्त 27 रोजी अमळनेरात होणार विविध कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात 27 रोजी फागन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यादिवशी भव्य श्री श्यामजी संकीर्तन व भव्य निशान यात्रा तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निशान यात्रा प्रथमच अमळनेर शहरात होत असून शुक्रवार दिनांक 27 रोजी सकाळी 8 वाजता न्यू प्लॉट,भागवत रोडवरील श्री महादेव मंदिरापासून प्रस्थान होणार आहे. तरी सर्वानी सहपरिवार सहभागी व्हावे असे आवाहन श्री लखतदार भक्त परिवाराने केले आहे.
तसेच श्री श्यामजी भव्य संकीर्तन न्यू प्लॉट, महाराणा प्रताप मार्ग येथे सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होणार आहे.भव्य दरबार-इत्र वर्षा, अखंड ज्योत-छप्पन भोग व फुलांची होळी हे मुख्य आकर्षण असेल.जानव्ही दिघे,सुरत व प्रदीप परमार,इंदोर हे संकीर्तन सादर करणार आहेत.तरी सर्वानी सहपरिवार सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक श्याम प्रेमी भक्त परिवार, अमळनेर यांनी केले आहे.

Leave a Reply