क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात; विद्यार्थिनींचा समाजकार्याचा संकल्प

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रीमती द्रौपदी  कन्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी समाजकार्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यामध्ये मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. माळी व एस. एस. वाघ, ज्येष्ठ शिक्षिका  एस. आर. सोनवणे, कार्यालयीन कर्मचारी शामभाऊ पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी मनु दीक्षित आणि पी. पी. जोशी यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या महान कार्याचा आणि समाजसुधारणेतील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा आढावा घेण्यात आला. त्यांनी शिक्षण, स्त्री-सक्षमीकरण, जातिव्यवस्थेविरुद्ध लढा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली.

त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात समानता, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी “शिक्षण हेच खरे शस्त्र आहे” हा संदेश आत्मसात करून समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थिनींचा उत्साह आणि सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *