
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा; आरोपीला अटक
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकरखेडा येथील २७ वर्षीय महिलेला गोड बोलून धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याची तक्रार अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी रोहिदास चत्तरसिंग बारेला (वय ३५, रा. अंबावतार, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ६४ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मूळची मध्य प्रदेशातील अंबावतार, ता. वरला, जि. बडवाणी येथील असून सध्या पतीसोबत अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे राहत होती. २२ ऑगस्ट रोजी तिचा पती शेतात गेला असताना रोहिदास चत्तरसिंग बारेला हा टाकरखेडा येथे आला. त्याने महिलेला गोड बोलून सोबत येण्यास प्रवृत्त केले आणि तिला धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथे घेऊन गेला.
रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास आरोपीने त्याच्या बहिणीच्या घराशेजारील घरात महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी, २३ ऑगस्ट रोजी महिलेचा पती तिला घेण्यासाठी आला. टाकरखेडा येथे परतल्यानंतर महिलेने पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ६४ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी रोहिदास चत्तरसिंग बारेला याला अटक केली आहे. पुढील तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत.

Leave a Reply