लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्याने स्थगित आमरण उपोषण पुन्हा सुरू आज दुसरा दिवस

अमळनेर (प्रतिनिधी) प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार मागण्यांवर कार्यवाही न झाल्याने सोमचंद संदानशिव यांनी १५ ऑगस्टपासून सुरू केलेले स्थगित आमरण उपोषण ५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार उपोषनाचा २ रा दिवस सुरू झाला आहे.

हॉटेल मिडटाऊन, मल्टिप्लेक्स, पात्र पावतीधारक सफाई कामगारांना टाकरखेडा रस्त्यावरील म्हाडाच्या घरकुलात घरे देणे तसेच ठगुआई रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम तोडून डीपी रस्ता मोकळा करणे या मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते.

सोमचंद संदानशिव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी एका महिन्यात सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले होते.

मात्र, लेखी आश्वासन देऊनही मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप सोमचंद संदानशिव यांनी केला आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या उपोषणातील मागण्यांच्या पूर्ततेसाठी ५ ऑक्टोबर २०२६ पासून स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. उपोषणामुळे निर्माण होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, अशी विनंतीही सोमचंद संदानशिव यांनी निवेदनातून केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *