अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या सर्व १३ संचालकांची बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका फ्रुटसेल सहकारी संस्था यांच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण १३ संचालकांची निवड प्रक्रिया पार पडली. सर्व संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील फळ बागायतदार शेतकरी सभासदांतून हे संचालक निवडायचे होते.

या निवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण ४७ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र दि. २७ रोजी माघारीच्या दिवशी ३४ जणांनी संस्थेचे हित लक्षात घेऊन बिनविरोध निवड व्हावी या उद्देशाने आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अखेर १३ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. महाजन यांनी दुपारी ४ वाजता सर्व १३ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेत संस्थेचे सचिव लहू पाटील व कर्मचारी यांनी सहकार्य केले. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमधून लवकरच चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवडही बिनविरोध करण्याचा निर्धार संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

 

निवडून आलेले संचालक असे

 

सर्वसाधारण गटातून : जयेशकुमार काटे (कोळपिंप्री, ता. पारोळा), भागवत पाटील (पाडळसरे, ता. अमळनेर),

नंदकिशोर नेरकर (कन्हेरे, ता. पारोळा), प्रताप पाटील (फाफोरे, ता. अमळनेर), प्रफुल्ल पाटील (कोळपिंप्री, ता. पारोळा), पुरुषोत्तम सूर्यवंशी (कंडारी खुर्द, ता. अंमळनेर), शामकांत पाटील (गोवर्धन, ता. अमळनेर), युवराज पाटील (बोहरे, ता. अमळनेर). महिला राखीव गटातून : मंगलाबाई चौधरी (निम, ता. अमळनेर), सुवर्णा अहिरराव (बोहरे, ता. अमळनेर). इतर मागासवर्गीय गटातून : सुरेश पाटील (निंभोरा, ता. अमळनेर), अनुसूचित जमाती गटातून : हिलाल सैदाणे (निम, ता. अमळनेर), विशेष भटक्या जमाती गटातून : ज्ञानेश्वर धरगर (बोहरे, ता. अमळनेर).

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *