
मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव’ दिनाचा कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव” दिनाचा कार्यक्रम झाला.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ कथाकर, कादंबरीकार, कवी, नाटककार आणि श्रेष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रा. डॉ. संजय पाटील पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी आपल्या मनोगताद्वारे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे थोर मराठी कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समिक्षक, विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव’ दिन म्हणून साजरा करण्यात आला. आपल्या मातृभाषेचा ‘गौरव’ म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. असे त्यांनी विद्यार्था़ंना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply