भुसावळ येथील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या कराटेपटूंनी मिळवले यश

अमळनेर ( प्रतिनिधी) भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनर येथील मास्टर करंदीकर यांच्या कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

भुसावळ शहरातील रंगमंच हॉल येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडल्या. यात बडोदा येथील सुशील करंदीकर यांच्या टीमने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरांच्या मास्टर अजमल शिकलीकर यांच्या टीमने सुद्धा अतिशय आक्रमक पद्धतीने यश संपादन केले. त्याचबरोबर अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळेजवळील पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर रोज सायंकाळी सुरू असलेल्या मास्टर करंदीकर यांच्या कराटे क्लास मधील विद्यार्थ्यांनी फार मोठे यश संपादन केले. यात लीना संतोष पाटील, खनक अमित पवार, ऋतिका स्वप्नील पाटील, प्रणाली स्वप्नील पाटील, भूमिका विकास जाधव, तेजस्विनी विकास जाधव, आयत राहिल खान, रीषिका गुरु गोयार,रेहंस हर्षल केळे, रोशन महेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर मनोज महाजन, राजवीर संदीप महाजन, अनंत निखिल वर्मा, गौरव दीपक पाटकर, समन्तक देवेंद्र देशमुख, मयूर दीपक पाटकरी, कृष्णा महेंद्र चौधरी, गणेश संदीप पाटील, प्रणव राजेंद्र पाटील, प्रशिक बाळासाहेब दोंदे, अक्षित रवि वर्मा, दुर्गेश नाना पाटील, सिद्धेश अमित पवार,साऊ सपकाळे यांचा समावेश आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *