
मयताच्या छातीत गोळी अडकली; आरोपीला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
अमळनेर (प्रतिनिधी )शहरातील गाजलेल्या गोळीबार प्रकरणात मयत अरुण महाजन यांच्या छातीत गोळी अडकल्याचे निष्पन्न झाले असून त्यासाठी कलर डॉप्लर सोनोग्राफी करण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र अमळनेर येथे संबंधित वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने मृतदेह पुढील तपासणीसाठी जळगाव येथे हलविण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण याला अमळनेर न्यायालय सुटीवर असल्यामुळे पोलिसांनी पारोळा येथील न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत आरोपीला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply