आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांचा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त

नंद्याच्या शेत परिसरातील जळालेला डिस्ट्रिब्युशन बॉक्स व केबल बदलून वीजपुरवठा सुरळीत

अमळनेर (प्रतिनिधी )चिमनपुरी-पिंपळे खुर्द व पिंपळे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांचा जळालेला ट्रान्सफॉर्मरचा डिस्ट्रिब्युशन बॉक्स व केबल अखेर दुरुस्त करण्यात आली असून, शेतातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने ही कार्यवाही झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी दत्त मंदिराजवळ काही शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत चर्चा करत होते. यावेळी त्यांच्या नंद्याच्या शेताकडील ट्रान्सफॉर्मरचा डिस्ट्रिब्युशन बॉक्स व केबल जळून निकामी झाल्याने सकाळपासून मोटारपंप बंद असल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाअभावी पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते.

यानंतर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसोबत अमळनेर येथील महावितरण कार्यालयात जाऊन मुख्य अभियंता अंबल यांची भेट घेण्यात आली. त्याच कार्यालयातून आमदार अनिल पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार अनिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सध्याची परिस्थिती लक्षात घेता ट्रान्सफॉर्मरचे काम तातडीने करून वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महावितरणच्या ठेकेदारामार्फत ट्रान्सफॉर्मरचे काम करण्यात आले. नवीन साहित्य उपलब्ध करून देत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, यासाठी आमदार अनिल पाटील तसेच महावितरण विभागाचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

यावेळी माजी सरपंच दिनेश पाटील, लोटन पाटील, विजय पाटील, बाळू पाटील, दिलीप पाटील, भटू पाटील, शिवा चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, उमाकांत चौधरी, हिरामण चव्हाण, आबा चैत्राम पाटील आदी शेतकरी बंधू उपस्थित होते.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *