अमळनेरात ब्रह्माकुमारी डॉ. सुनीता दीदी यांची प्रेरणादायी वार्ता ‘सकारात्मक बने रहें, चाहे कुछ भी हो!’ विषयावर आज मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी )श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभअवसरी ब्रह्माकुमारी अमळनेर सेवाकेंद्रातर्फे आज, मंगळवार दि. ८ सप्टेंबर रोजी प्रेरणादायी व अनुभवात्मक वार्तेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सकारात्मक बने रहें, चाहे कुछ भी हो!’ या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रेरक वक्त्या राजयोगिनी बी.के. डॉ. सुनीता दीदी मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय, दादासाहेब देशमुख नगर, सेंटरजवळ, अमळनेर येथे होणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी प्रभू प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

१०० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या राजयोगिनी बी.के. डॉ. सुनीता दीदी या ब्रह्माकुमारी मुख्यालय, आबू रोड येथील वरिष्ठ राजयोग शिक्षिका असून आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना १०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

‘सकारात्मक सोच हर परिस्थिती को विकास और खुशियों के एक अवसर में बदल सकती है!’ हा त्यांच्या मार्गदर्शनाचा मुख्य संदेश असणार आहे. जीवनातील प्रतिकूल परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे महत्त्व त्या आपल्या अनुभवातून स्पष्ट करणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारी राजयोगिनी विद्या दीदी, प्रभारी—ब्रह्माकुमारीज अमळनेर सेवाकेंद्र, यांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘आइए, श्री कृष्ण जैसे सदा सकारात्मक बनें…’ असे आवाहन आयोजकांनी केले असून, अमळनेरकरांनी या प्रेरणादायी वार्तेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *