प्रताप हायस्कूलचा ११८ वा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंतांचा केला गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूलचा ११८ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. परीक्षित बाविस्कर, डॉ. स्वाती बाविस्कर, कमल कोचर, माधुरी पाटील, वसुधरा लांडगे, निरज अग्रवाल, जितेंद्र जैन, हरीअण्णा वाणी, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडे, लीना पाटील, पराग पाटील, विजय मांटे, दिनेश भालकार, राहुल पाटील, व्ही. एम. पाटील, एस. एस. सूर्यवंशी, एच. डी. जाधव, सपना शिसोदे, भारती आठवले, कैलास पाटील, एस. बी. निमक, बाळा कदम, भरत पवार आणि दीपक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत, दीपप्रज्वलन आणि शाळेचा लोगो आकाशात सोडून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. पी. बाविस्कर यांनी वार्षिक अहवाल सादर केला, तर सचिन अहिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या शालेय क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रताप हायस्कूलच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या दात्यांचा आणि हितचिंतकांचाही गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमात शाळेचे माजी शिक्षक प्रल्हाद रामदास बाविस्कर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यासाठी संस्थेला एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुहास खांजोडकर आणि कृष्णा कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश पालवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल पाटील, जयश्री पाटील, लक्ष्मण पाटील, विद्या पटेल, नम्रता दोरकर, सागर पवार, प्रसाद बुवा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वंदे मातरम्‌ने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *