राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन राजपुत यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन देवसिंग राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी ही नियुक्ती केली. नुकत्याच अमळनेर येथे पार पडलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत राजपुत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. गेल्या १० वर्षांपासून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे मुक्तार खाटीक यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर तरुण व ऊर्जावान चेहरा म्हणून चेतन राजपुत यांची निवड करण्यात आली आहे.

चेतन राजपुत हे विद्यार्थी दशेपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी व्यापक जनसंपर्क निर्माण केला आहे. ते न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष तसेच राजपुत एकता मंचचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. शहरात मजबूत संघटन उभारण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *