“शिक्षकच देशाचे खरे आधारस्तंभ” : प्रा. डॉ. एस. ओ. माळी

विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर  कॉलेजमध्ये सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांचा सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी)  शिक्षक हेच देशाचे खरे आधारस्तंभ असून सीटीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होऊन शिक्षकांनी या स्तंभाला अधिक बळकटी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रती त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे, असे मत खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चिटणीस तथा निवृत्त उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. ओ. माळी यांनी व्यक्त केले.

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नवलभाऊ प्रतिष्ठान, रुख्मिणीताई प्रतिष्ठान (मुंबई), संजय एज्युकेशन सोसायटी व ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीटीईटी (फेब्रुवारी २०२६) उत्तीर्ण शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रा. श्याम पवार, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, आर्मी स्कूलचे निवृत्त प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, प्राचार्य बी. डी. पाटील, जेष्ठ मुख्याध्यापक पी. एम. कोळी, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका कल्पना महंत, मुख्याध्यापक एच. एस. पाटील, मुख्याध्यापक उद्धवराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. श्याम पवार व एस. डी. देशमुख यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले, तर अतुल लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जेष्ठ क्रीडा शिक्षक स्वर्गीय बी. पी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक उद्धवराव पाटील व जेष्ठ इंग्रजी विषय शिक्षक एस. डी. पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील व मार्गदर्शिका शीलाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रा. सुनील गरुड यांनी प्रास्ताविक केले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या शिक्षकांचा झाला सन्मान

 

या सन्मान सोहळ्यात संस्थेतील १२ शिक्षकांनी सीटीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. यात देविदास धर्मा घोडेस्वार, संतोष भास्करराव पवार, शरद भिका पाटील, उमेश प्रतापराव काटे, अनिल अशोक वानखेडे (विजयनाना पाटील आर्मी स्कूल, अमळनेर), गजानन लक्ष्मण पाटील, अतुल सुधाकर लोहार, मोनाली नानाभाऊ सूर्यवंशी (सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, पिंपळकोठे, ता. एरंडोल), विशाल श्रीराम लांबोडे (सरस्वती माध्यमिक विद्यालय, सडावण, ता. अमळनेर), समाधान नगीनदास कोळी (ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय, रोटवद, ता. धरणगाव), विकास पदमर (संत मीरा माध्यमिक विद्यालय, छत्रपती संभाजीनगर) व श्रीमती विजया युवराज पाटील (पंडित नेहरू सह शेती विद्यालय, नवलनगर). यांचा समावेश होता.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *