मूडी प्र. डां. ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मूडी प्र. डां. येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच श्रीमती मंदाबाई भाऊराव पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव २४ एप्रिल २०२६ रोजी मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे सभेस उपस्थित सर्व ९ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरपंचांवर मनमानी कारभार, व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव, उपसरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे तसेच विकासकामांमध्ये अडथळे निर्माण केल्याचे आरोप करत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार २४ एप्रिल रोजी झालेल्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होऊन मतदान घेण्यात आले. या बैठकीस उपसरपंच मनीषा गणेश चव्हाण यांच्यासह मनिषा हेमंत पाटील, ललिता गणेश भोई, छायाबाई तुषार पाटील, मीनाबाई सुपडू भील, विलास गुलाबराव सूर्यवंशी, किशोर सदाशिव चव्हाण, मनोहर रोहिदास पाटील, संजय शामराव वडर, ग्रामसेवक, तलाठी विनोद पाटील व रवि पाटील उपस्थित होते. उपस्थित सर्व ९ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने तो एकमताने मंजूर झाला. या प्रक्रियेत गौरव उदय पाटील, प्रणव सुनिल पाटील, माजी सरपंच संजय युवराज पाटील, सुरेखा चंद्रसेन पाटील, माजी सरपंच काशिनाथ दगा माळी यांनी मार्गदर्शनाची भूमिका बजावली. तसेच संजय जिजबराव पाटील, तुषार गणपत पाटील, गणेश भाई, मनोज बडगुजर, हेमंत गुलाबराव पाटील, सुपडू भील, हिरालाल साहेबराव बडगुजर, गोकुळ लोटन पाटील, शरद उत्तम पाटील, उदय वसंतराव पाटील, अनिल जिजाबराव पाटील, जितेंद्र भिकन पाटील, शांताराम दंगल पाटील, रंगा भोई, दिलीप देशमुख, राजू पाटील, गुलाब वडर, बाळासाहेब युवराज पाटील आदींचे सहकार्य लाभले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *