अमळनेर तालुक्यातील एकरुखी येथे शॉर्ट सर्किटमुळे झोपडी जळून खाक; शॉक लागून गाय ठार

अमळनेर (प्रतिनिधी )तालुक्यातील एकरुखी येथे शॉर्ट सर्किटमुळे झोपडीला आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एका गायीचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू भालचंद्र भिल हे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घराजवळील झोपडीत गुरांना पाणी पाजून घरी परतले होते. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने शेजाऱ्यांनी आरडाओरड करत त्यांना झोपडीला आग लागल्याची माहिती दिली.

घटनास्थळी धाव घेतल्यानंतर, झोपडीवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे निदर्शनास आले. तसेच गायीच्या अंगावर शॉक लागल्याचे व्रण आढळून आले.

दरम्यान, गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *