
भगवान स्वामीनारायण जयंतीनिमित्त अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात दि. २४ पासून भगवान स्वामीनारायण जयंतीनिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४ रोजी सकाळी ७ वाजता प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीत हरिभक्तांनी सहभागी होत भजन-कीर्तनाच्या गजरात मंदिर प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मंदिरात शृंगार आरती व प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री ८ वाजता आयोजित सभेत प्रवचन व धार्मिक मार्गदर्शन करण्यात आले. दि. २५ व २६ रोजी देखील सकाळी प्रभात फेरी, शृंगार आरती व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता भगवान स्वामीनारायण जयंती उत्सवानिमित्त विशेष सभा व प्रवचन होणार आहे. या कार्यक्रमांचा सर्व हरिभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पूज्य योगीस्नेह स्वामी, पूज्य अखंडमुनी स्वामी तसेच बीएपीएस स्वामीनारायण मंदिर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या जयंती उत्सवामुळे अमळनेर परिसरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply