श्री राम नवमी निमित्त अमळनेर येथील श्री राम मंदिरात भजन-कीर्तन व राम जन्मोत्सव होणार साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) राम नवमी निमित्त येथील प्रताप महाविद्यालयासमोरील श्री राम मंदिरात २४ ते २६ मार्च दरम्यान भजन, कीर्तन व श्री राम जन्मोत्सव कथांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धेय राजीव कृष्णाजी झा महाराज यांच्या अमृत वाणीतून हे कार्यक्रम होत असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री राम जन्मोत्सव कथा पार पडली. दि. २५ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत श्री राम जन्मोत्सव कथा होणार आहे. तर दि. २६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत भजन संध्या पार पडणार असून त्यानंतर श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत प्रताप शेठजी यांचे वारस असलेल्या धुळे येथील स्वर्गीय महेश अग्रवाल यांच्या परिवारातर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात आले असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. २६ रोजी श्री राम नवमीच्या दिवशी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व रामभक्तांनी कार्यक्रम व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमंत प्रताप शेठ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *