एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याने डॉ. प्रसाद पाटील यांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांचे सुपुत्र डॉ. प्रसाद पाटील यांनी एमबीबीएस परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. प्रसाद पाटील यांनी येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशामुळे अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सत्कार समारंभाला उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार सी. यू. पाटील तसेच महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. प्रसाद पाटील यांचे कौतुक करत पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर डॉ. प्रसाद यांनी हे यश मिळवले असून युवकांसाठी ते प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *