
मुलांचे भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) लहान मुलांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना अमलेश्वर नगर, माळीवाडा परिसरात २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गणेश पांडुरंग माळी हे परिसरातील मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेले होते. त्यावेळी जगदीश मगन महाजन याने संतापाच्या भरात गणेश माळी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर गणेश माळी यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी जगदीश महाजन याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी नितीन मनोरे करीत आहेत. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply