मुडी प्र. डांगरी येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा युवक ताब्यात; मारवड पोलिसांनी केली कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे हातात तलवार घेऊन फिरत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या युवकाला मारवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांना मुडी प्र. डांगरी येथे एक इसम तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण रमेश पारधी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय वाल्मीक सूर्यवंशी, सफौ आणि दीपक पाटील यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांचे पथक गावात पोहोचले असता एक युवक हातात तलवार घेऊन उभा असल्याचे दिसून आले. त्याच्या काही अंतरावर आठ ते दहा जण उभे असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित युवकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव भूषण दिलीप बडगुजर (वय ३४, रा. मुडी प्र. डांगरी, ता. अमळनेर) असे निष्पन्न झाले. त्याच्याकडील मूठ नसलेली व कापड बांधलेली तलवार पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण पारधी करीत आहेत. या कारवाईमुळे गावात निर्माण होणारी संभाव्य दहशत आणि अनुचित प्रकार टळल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *