
महाशिवरात्रीला अमळनेर आगारात भाविकांना केले फराळाचे वाटप
कपिलेश्वर यात्रोत्सवासाठी १८ फेब्रुवारीपर्यंत जादा बसेसची सुविधा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील रा.प.आगारात महाशिवरात्रीनिमित्त प्रवासी बांधवांना फराळ वाटप करण्यात आले.विशेष करून कपिपलेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी आगार व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. असंख्य भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. या वेळी स्थानक प्रमुख तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कपिलेश्वर येथे यात्रोत्सव सुरू असल्याने येथे जाणाऱ्या भाविकांसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आलेल्या असून दिनांक १८ फेब्रुवारीपर्यंत भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केलेले आहे.

Leave a Reply