
खर्दे-खेडी वि.का.सह. सोसायटीच्या चेअरमनपदी सर्जेराव पाटील तर उपाध्यक्षपदी रेखाबाई पाटील यांची बिनविरोध निवड
अमळनेर (प्रतिनिधी) खर्दे-खेडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे निकटवर्तीय सर्जेराव पाटील यांची, तर व्हा. चेअरमन पदावर रेखाबाई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
ही निवड दहा एप्रिल रोजी पार पडली. या निवड प्रक्रियेदरम्यान संचालक प्रतिभा मंगलाल पाटील, रोहीदास भटा पाटील, सुभाष भाईदास पाटील, गोटू काशीराम परदेशी, हिमंत शंकर पाटील, रामचंद्र श्रावण पाटील, गोपाल श्रीराम पाटील, विजय रघुनाथ पाटील, संजय निळकंठ पाटील, समाधान गोरख धनगर आणि नाना सिताराम भिल उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून संजय कुलकर्णी यांनी काम पाहिले, तर सचिव कैलास पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. या प्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह विश्वास पाटील, किशोर पाटील, प्रविण पाटील, सुनील पाटील, गुलाब पाटील, चैत्राम पाटील, पदम नाना, जीवन परदेशी, राकेश पाटील, सुधाम पाटील, दीपक पाटील, कन्हैयालाल पाटील, भिकन पाटील, मनोहर पाटील, उत्तम पाटील, रोहन पाटील, उमेश पाटील, सुभाष परदेशी, रवींद्र परदेशी, नारायण पाटील, भैय्यासाहेब पाटील, अभिमन पाटील, भाऊसाहेब पाटील, राघो पाटील, धनराज पाटील, रतिलाल पाटील, अमृत पाटील, रमेश पाटील, शांताराम पाटील, गोपीचंद पाटील, हंसराज पाटील, दिनेश पाटील, डॉ. खेमचंद पाटील, नवल भिल, गुलाब भिल, संजु मिस्त्री, राजेंद्र पाटील, बापू पाटील, राधेश्याम पाटील, संतोष पाटील, नितीन पाटील, भरत पाटील, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या निवडीमुळे परिसराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply