मॅरेथॉन स्पर्धेत अमळनेरकरांचा उत्स्फूर्त सहभाग; तेजस सपकाळे व उन्नती पाटील प्रथम

महात्मा फुले–डॉ. आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त आयोजन

 

अमळनेर (प्रतिनिधी) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्य, आरोग्य आणि महापुरुषांच्या विचारांचा संदेश दिला. यात तेजस सपकाळे व उन्नती पाटील प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक काकडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदनशिव, सिद्धार्थ शिसोदे, किरण पाटील (पत्रकार) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सकाळच्या उत्साही वातावरणात सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक, युवती तसेच विविध वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

पुरुष गटात तेजस सपकाळे (नाशिक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश वारुडे (नाशिक) यांनी द्वितीय, तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील खुमानसिंग ठाकरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे ७००० रुपये, ५००० रुपये आणि ३००० रुपये रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. महिला गटात उन्नती पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर आरती पाटील यांनी द्वितीय आणि ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ५००० रुपये, ३००० रुपये आणि २००० रुपये रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्यासह अविनाश संदानशिव, गौतम मोरे, देवदत्त संदानशिव, सुनील वाघ, सुनील करंदीकर, गोपीचंद चव्हाण, राहुल संदानशिव, श्रीचंद चव्हाण, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर संदानशिव, गोकुळ बिऱ्हाडे, प्रा. कृष्णा संदानशिव, नितीन संदानशिव, स्वप्नील पाटील, राजेंद्र संदानशिव, समाधान बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, दिनेश संदानशिव, जितेश संदानशिव, तुषार संदानशिव, परम चव्हाण, शुभम घोलप, अभिषेक संदानशिव, प्रेम बैसाने, सागर बिऱ्हाडे, सुमेध मोहिते, दीपक सोनवणे, विजय संदानशिव, गणेश ब्रह्मे, काशिनाथ संदानशिव, संदीप संदानशिव, संदीप वाघ, राजरत्न सोनवणे, नाना पाटील आदींनी मोलाचे सहकार्य केले.

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रप्रभा नेतकर, नीलिमा जाधव, अनिता जाधव, किरण चव्हाण, वर्षा चव्हाण, सुनंदा संदानशिव, दिपाली संदानशिव, सोनल पवार, नितल चव्हाण आणि गौतमी चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *