साने गुरुजी विद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत तपन प्रकाश पाटील अव्वल

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी विद्यालय, अमळनेर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधील ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या वक्तृत्वाची चमक दाखवली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत तपन प्रकाश पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नेहा राकेश पाटील यांनी द्वितीय, तर गौरीकांत धनराज बोरसे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव अधिवक्ता अशोक बाविस्कर, संचालक भास्करराव बोरसे, संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे आणि मुख्याध्यापक संजीव पाटील उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी केले. सुनील पाटील यांनी स्पर्धेचे नियम स्पष्ट केले. परीक्षक म्हणून प्रा. अशोक पवार, वसुंधरा लांडगे आणि प्रा. शीला पाटील यांनी काम पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर आणि मुकेश पाटील यांनी केले. स्पर्धेच्या नावनोंदणीची जबाबदारी मुस्ताक शेख आणि जयेश मासरे यांनी सांभाळली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या पाटील, रवींद्र कोळी, मोनाली वंजारी, दीपक सोनवणे, यशोदा महाले, गोपाल बडगुजर आणि कुणाल चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

गुलाबराव पाटील यांच्या कार्यावर विद्यार्थ्यांनी मांडले विचार

 

या वर्षीच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी पाच विषय देण्यात आले होते. त्यामध्ये ‘विधानसभेतील गुलाबराव’, ‘साने गुरुजींचा वैचारिक वारसा – साथी गुलाबराव पाटील’, ‘साथी गुलाबराव पाटील : राजकीय प्रवास’, ‘मुलुख मैदानी तोफ : साथी गुलाबराव पाटील’ आणि ‘गुलाबरावांनी केले काय? जनआंदोलनात तुरुंगात पाय असे होते’ या विषयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयांवर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी करत उपस्थितांची दाद मिळवली. साने गुरुजींच्या विचारांचा वारसा तसेच साथी गुलाबराव पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *