वीर गुर्जर सेनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड; पत्रकार वसंतराव पाटील दाम्पत्याचा सपत्नीक सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक लोकमतचे पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील यांची महाराष्ट्र राज्यातील गुर्जर समाजासाठी कार्य करणाऱ्या वीर गुर्जर सेनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

वीर गुर्जर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी वसंतराव पाटील यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. तसेच ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कदम व भगवान सोनार यांनी त्यांची ‘गर्जना ग्रामीण पत्रकार संघटने’च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी एकमुखी निवड केली आहे. या दुहेरी निवडीबद्दल पाडळसरे येथील निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील व आशाबाई वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी माजी उपसरपंच भटू पाटील तसेच शिवसेनेचे तालुका संघटक इंजि. चंद्रशेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून वसंतराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *