प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांची विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्षपदी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभाग व संशोधन केंद्र प्रमुख प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधरी यांची क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी कुलगुरूंनी नामनिर्देशन केले आहे.

प्रा. चौधरी यांच्या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष नीरज भाऊ अग्रवाल, उपकार्याध्यक्ष जितेंद्र जैन, डॉ. संदेश गुजराथी, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडे, हरी भिका वाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळ सदस्य व विश्वस्त यांनी अभिनंदन केले. तसेच माजी प्राचार्य डॉ. अरुण जैन, प्राचार्य एस. आर. चौधरी, संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव, प्रा. डॉ. संदीप नेरकर यांनीही शुभेच्छा दिल्या. इतिहास अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील कुलगुरूंनी नामनिर्देशित प्रा. डॉ. व्यंकटेश लांब, प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी, प्रा. डॉ. सचितानंद बिच्चेवार, प्रा. डॉ. दत्तात्रय वाघ, प्रा. डॉ. किशोर पाटील यांचा समावेश आहे. तसेच तत्त्वज्ञान केंद्र अमळनेरचे मानद संचालक प्रा. डॉ. मनिष करंजे, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. विजय साळुंखे, प्रा. अवीत पाटील, प्रा. प्रसाद मुठे, प्रा. प्रियंका चावडा, तसेच सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रा. चौधरी यांचे स्वागत केले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील इतिहासप्रेमी, संशोधक व प्राध्यापकांनीही या निवडीचे स्वागत केले असून त्यांच्या निवडीमुळे इतिहास संशोधन व शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *