अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीची बैठकीत स्वच्छता, भूमी सुपोषण जनजागृतीवर चर्चा

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीची शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्वच्छता, भूमी सुपोषण जनजागृती व निवडणूक समितीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

श्री स्वामी समर्थ मंदिरा शेजारील विद्युत कर्मचाऱ्यांच्या पतपेढीत बैठक झाली. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी होते.बैठकीत चार महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीतील पहिला विषय अमळनेर येथील काँग्रेस भवनासंदर्भात होता. काँग्रेस भवन हे ऐतिहासिक वारसा जपण्याचे ठिकाण असल्याने त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत कृष्णा पाटील, पार्थराज पाटील, रामकृष्ण पाटील, विवेक पाटील आणि भगवान संधान शिव यांनी सहभाग घेतला. चर्चेनंतर काँग्रेस भवनाच्या पडक्या वास्तूतील सर्व मलबा बाहेर काढून साफसफाई करावी व जागेची मोजणी करावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यासाठी लोटन चौधरी, शांताराम शामराव पाटील, मनोज पाटील, संदीप घोरपडे, बी. के. सूर्यवंशी आणि गजेंद्र साळुंखे यांना अधिकार व जबाबदारी देण्यात आली. तसेच आवश्यक पत्रव्यवहार तालुकाध्यक्षांनी करावा असेही ठरविण्यात आले. बैठकीतील दुसरा विषय शेतजमीन किंवा भूमी सुपोषण व संरक्षणाबाबत होता. श्री मंगल ग्रह संस्थेच्या मंडळाच्या पुढाकाराने अमळनेर तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांना भूमी सुपोषणाबाबत जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. रासायनिक खते व रासायनिक औषध फवारणीच्या अति वापरामुळे शेतीवर होणारे दूरगामी दुष्परिणाम व नुकसान याबाबत पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट स्तरावर सभा घेऊन शेतकऱ्यांना सजग करण्याचे ठरले. तिसरा विषय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात तालुकास्तरीय समिती नेमण्याचा होता. यावर सविस्तर चर्चेनंतर शांताराम शामराव पाटील, संभाजीराव लोटन पाटील, अधिकार नथू पाटील, प्रा. शाम पवार, रोहिदास कापडे आणि मगन वामन पाटील यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती गट व गणनिहाय बैठका घेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी उमेदवार निश्चित करेल असे ठरविण्यात आले. या बैठकीस डॉ. प्रकाश सोनवणे, अरुण पाटील, हर्षल जाधव, नागराज पाटील, दिलीप पाटील, युवराज पाटील, सुरेश लहू पाटील, सईद तेली, राजू भाट, अनिल पाटील, सुधाकर भैसे, सुभाष शिंदे, पितांबर पाटील, कन्हैयालाल कापडे, भिकाजी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *