‘मुंदडा ऑप्टिकल्स’चे संचालक अभिनय मुंदडा यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन २०२५’ पुरस्कार जाहीर

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मुंदडा ऑप्टिकल्सचे शिल्पकार, संस्थापक व संचालक अभिनय मुंदडा यांची ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाल्याने शहरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सेवा आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोन यांचा सुरेख संगम साधनारे मुंदडा ऑप्टिकल्स आज अमळनेर व परिसरातील नेत्रसेवेतील विश्वासार्ह नाव बनले आहे. या मुंदडा ऑप्टिकल्स येथे संगणकीकृत नेत्रतपासणी, अचूक नंबरचे चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्सेस तसेच प्रीमियम सनग्लासेस अशा सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात येतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सचे फ्रेम्स, आधुनिक डिझाईन्स, टिकाऊपणा व आरामदायी वापर यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील ग्राहकांचा विश्वास या संस्थेवर कायम आहे. बदलत्या ट्रेंडनुसार अद्ययावत कलेक्शन आणि परवडणाऱ्या किमती ही मुंदडा ऑप्टिकल्सची खास ओळख ठरली आहे.

वडील नरेंद्र मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय मुंदडा हे काम करीत असतात. त्यांच्या कुशल नेतृत्वाने येथे अचूकता, पारदर्शक व्यवहार आणि वैयक्तिक सल्ला याला विशेष प्राधान्य दिले जाते. पहिल्यांदा चष्मा लावणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते आधुनिक लेन्स तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या प्रौढांपर्यंत प्रत्येक ग्राहकाला योग्य मार्गदर्शन व विश्वासार्ह उपाय देण्यात येतात.

गुणवत्ता, सातत्यपूर्ण सुधारणा आणि ग्राहक समाधान यांवर ठाम विश्वास ठेवत मुंदडा ऑप्टिकल्सने अल्पावधीतच अमळनेर व परिसरातील आघाडीचे ऑप्टिकल केंद्र म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अभिनय मुंदडा यांची ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन २०२५’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, ही निवड अमळनेरसाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *