शिवसेना ओबीसी आघाडीच्या अमळनेर तालुकाप्रमुखपदी दीपक चौधरी यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी)  शिवसेना (शिंदे गट) ओबीसी आघाडीच्या अमळनेर तालुकाप्रमुखपदी दीपक देविदास चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना संघटनेला तालुक्यात अधिक बळ मिळणार असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार-प्रसार करणे तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी दीपक चौधरी यांची निवड जाहीर केली.

नियुक्तीनंतर दीपक चौधरी यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

या निवडीबद्दल माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख रुपेश माळी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दीपक चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *