अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात अमळनेरमध्ये वज्रमूठ; तालुक्यात भव्य मोर्चाचा निर्धार

अमळनेर (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती संवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून अमळनेर तालुक्यातील विविध समाजघटक एकवटले असून, या निर्णयाला विरोध करण्यासाठी तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शहरातील साने गुरुजी विद्यालयात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अनुसूचित जाती संवर्गातील विविध समाजघटकांची सहविचार सभा झाली. या सभेत उपवर्गीकरणाविरोधात एकजुटीने लढा उभारण्याचा आणि तालुकास्तरावर भव्य मोर्चा काढण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

येत्या महिन्यात जिल्हास्तरावर उपवर्गीकरणविरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अमळनेर तालुक्यात सर्वप्रथम उपवर्गीकरणविरोधी मोर्चा काढण्याचा निर्णय सहविचार सभेत घेण्यात आला. चर्मकार महासंघाचे ज्येष्ठ नेते भानुदास विसावे यांनी मार्गदर्शन करताना, “भविष्यात येणाऱ्या असंवैधानिक संकटाला परतवून लावण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन वज्रमूठ आवळण्याची गरज आहे,” असे सांगितले. या सहविचार सभेला बौद्ध, चांभार, होलार, मातंग व मेहतर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपवर्गीकरणाच्या विरोधातील लढ्यात सर्व समाजघटकांनी खांद्याला खांदा लावून सहभागी होण्याची आणि प्रस्तावित मोर्चा यशस्वी करण्याची शपथ घेतली. उपवर्गीकरणविरोधी कृती समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व अनुसूचित जाती घटकांना मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, नरेश कांबळे, विजय बिऱ्हाडे, आरपीआयचे यशवंत बैसाने, ॲड. प्रशांत संदानशिव, सनी गायकवाड, अरुण मोरे, सोमचंद संदानशिव, हृदयनाथ मोरे, अतुल डोळस, बापूराव संदानशिव, योगराज संदानशिव, अर्जुन संदानशिव, अरुण घोलप, गौतम मोरे, अशोक बिऱ्हाडे, सुभाष आगळे, भगवान संदानशिव, अनिकेत ब्रम्हे, अशोक सैंदाने, दगडू सोनवणे, राहुल वाडेकर, मच्छिंद्र साळुंखे, राजेंद्र सैंदाने, गौतम शिरसाठ, उत्तर वानखेडे यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *