अमळनेर शहरातून दोन विवाहिता बेपत्ता; पोलिसांत हरवल्याच्या तक्रारी दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील रघुराजस नगर-शिरूड नाका आणि वड चौक-बालाजीपुरा परिसरातून १८ ऑगस्ट रोजी दोन विवाहिता बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटनांप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात हरवल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांकडून बेपत्ता महिलांचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रघुराजस  परिसरात  महिला  (वय २९) आणि मुलगा  यांच्यासोबत राहतात. तर त्यांचा मुलगा  शाळेत गेला होता. त्यावेळी ती महिला घरी एकटीच होती. सकाळी १० वाजता पती यांनी शेजाऱ्यांना फोन करून पत्नी घरी आहे का, अशी विचारणा केली असता, त्यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पती यांनी तातडीने घरी येऊन घरात तसेच आजूबाजूच्या परिसरात आणि शहरातील विविध भागांत माधुरीचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर त्यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल नरेश बडगुजर करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत अमळनेर शहरातील वड चौक-बालाजीपुरा परिसरात पती हे पत्नी महिला (वय २६) आणि मुलगी  (वय ३) यांच्यासोबत राहतात. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता महिला ही मुलगी सोबत  महादेव मंदिरात दर्शन घेऊन येते, असे सांगून घरातून बाहेर पडली. बराच वेळ उलटूनही महिला आणि मुलगी मुलगी घरी परतल्या नाहीत. त्यामुळे पती यांनी मंदिर परिसरासह इतर ठिकाणी दोघींचा शोध घेतला. मात्र त्या मिळून न आल्याने अखेर अमळनेर पोलिस ठाण्यात आई-मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेचाही पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल नरेश बडगुजर करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *