
‘माझा संकल्प- भूमी सुपोषण’ चळवळीसाठी अमळनेरला उद्या निघणार भव्य महाशोभायात्रा
अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे नागरिकांना उपस्थितीचे आवाहन 
अमळनेर (प्रतिनिधी ) माझा संकल्प- भूमी सुपोषण चळवळीसाठी जनजागर होण्यासाठी कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था अक्षय कृषी परिवार व येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी भव्य महाशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ही महाशोभायात्रा सुरू होण्यापूर्वी सर्वांना पोटभर नाश्ता दिला जाणार आहे. महाशोभायात्रा मार्गावरही ठिकठिकाणी गोळ्या- बिस्किटे, हलका- फुलका नाश्ता व जलपानाची व्यवस्था केली जाणार आहे.ऐतिहासिक व अभूतपूर्व होणाऱ्या या महाशोभायात्रेसाठी सर्व शाळा- महाविद्यालये, विद्यार्थी- विद्यार्थिनी, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व महिला संघटनांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व श्री मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.
महाशोभायात्रा प्रारंभ आणि स्थळ व मार्ग असा
महाशोभायात्रेस बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थान येथून प्रारंभ होईल. संतश्री सखाराम महाराजांची वाडी- सराफ बाजार- कोंबडी बाजार- हॉटेल पायल- राणी लक्ष्मीबाई चौक- मोठा बाजार- दगडी दरवाजा- फरशी रोडमार्गे श्री मंगळग्रह मंदिरात महाशोभायात्रेची सांगता होईल. त्यांनतर मंदिरात महाशोभायात्रेतील सहभागींसाठी भोजन व्यवस्था आहे.

Leave a Reply