हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात अमळनेर भाजपतर्फे जाहीर निषेध, माफी मागण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष मानावे, असे केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या विधानाच्या निषेधार्थ सोमवारी अमळनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांची तुलना इतर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीशी करणे अयोग्य असल्याची भूमिका उपस्थितांनी मांडली. या आंदोलनात योगेश महाजन, डॉ. अनिल शिंदे, ॲड. व्हि. आर. पाटील, संदीप पाटील, श्याम पाटील, लालू सेनानी, भारती सोनवणे, हिरालाल पाटील, विजय राजपूत, तुळशीराम हटकर, देवा लांडगे, हरचंद लांडगे, विजय पाटील, दीपक पाटील, महेश पाटील, दीपक पवार, भरत परदेशी, हर्षल महाजन, अनिरुद्ध शिसोदे, कुणाल चौधरी, कल्पेश पाटील, शुभम पवार, उज्वल मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी सपकाळ यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *