पिंपळे नाल्याच्या कथित अतिक्रमणाविरोधात उद्या आमरण उपोषण

अमळनेर (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक १६ मधील पिंपळे नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहावर लेआऊट जागा मालक व बिल्डरांकडून कथित भराव व अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीवर प्रशासनाने तातडीने मोजणी करून कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे हे २ ऑक्टोबर रोजी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.

नाल्याची संयुक्त मोजणी करून मूळ हद्द व नैसर्गिक रुंदी निश्चित करावी, कथित अतिक्रमणाचा पंचनामा करावा आणि अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी भूषण संजय भदाणे यांनी केली आहे. “पूराची वाट पाहू नका; नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वाचवा!” असा संदेश देत त्यांनी प्रशासनाला उपोषणाची अंतिम पूर्वसूचना दिली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *