दहिवदच्या माय लेकीचा नवी मुंबईत डंका; दहिवद विकास मंचतर्फे दोन्ही नगरसेविकांचा भव्य सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दहिवद गावाचे सुपुत्र अंकुश सोनवणे यांच्या पत्नी हेमांगी सोनवणे आणि कन्या कुमारी ऐश्वर्या सोनवणे यांची नगरसेविका म्हणून निवड झाल्याबद्दल दहिवद विकास मंचच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. दहिवदच्या दोघींनी महानगरात मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

पोलीस पाटील प्रतिभा देसले यांच्या निवासस्थानी हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला दिनेश पाटील (सदस्य, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली), संगीता दिनेश पाटील (संचालिका, किमया अग्रो सोल्युशन कंपनी, पुणे), निलेश भदाणे (उपआयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), सुभाष देसले (माजी उपसभापती, पंचायत समिती अमळनेर) आणि जयवंतराव पाटील (माजी सरपंच) यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच प्रविण माळी (माजी उपसरपंच), देवानंद बहारे (माजी सरपंच), चंद्रकांत देसले (माजी विस्तार अधिकारी), ईश्वर महाजन (माजी चेअरमन, वि.का. सोसायटी), शिवाजी पारधी (माजी गटनेता, ग्रामपंचायत दहिवद) यांच्यासह यशवंत भदाणे, दत्तात्रय देसले, राजेंद्र भदाणे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष देसले (माजी उपसभापती) यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिवाजी पारधी (माजी गटनेता) यांनी मानले. गावाच्या प्रगतीचा संदेश देणारा आणि ऐक्याची भावना दृढ करणारा हा सोहळा गावकऱ्यांच्या स्मरणात राहणारा ठरला.

 

गावाचे ऋण फेडू: सत्काराला उत्तर

 

सत्काराला उत्तर देताना नगरसेविका हेमांगी सोनवणे भावूक होऊन म्हणाल्या, “गावाने आमचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार केला, हे आमच्या परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. हा मान आम्ही कधीही विसरणार नाही आणि ग्रामस्थांच्या प्रेमाचे ऋण आयुष्यभर फेडू.” तर अंकुश सोनवणे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दहिवदचा गौरव सर्वत्र पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. दिनेश पाटील (सदस्य, आयसीएआर) यांनी आपल्या मार्गदर्शनात आवाहन केले की, गावातील जे सुपुत्र बाहेरगावी उच्च पदावर कार्यरत आहेत, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडले पाहिजे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *