अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते डॉ. दिपाली साळुंखे यांना महाराष्ट्र बिजनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड

अमळनेर (प्रतिनिधी)  वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमळनेर येथील तेजस स्किन अँड हेअर क्लिनिकच्या संचालिका डॉ. दिपाली साळुंखे यांना सन २०२५ साठीचा महाराष्ट्र बिजनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा सन्मान सोहळा २७ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथील सोमा वाईन्स, गंगापूर रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते डॉ. साळुंखे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्वचारोग व केसांच्या उपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, रुग्णांप्रती संवेदनशील दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण सेवा यामुळे डॉ. साळुंखे यांनी अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या पुरस्कार सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. दिपाली साळुंखे यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *