अमळनेरात रविवारी श्री. गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील जी. एम. सोनार नगर, मुंडडा नगर १ जवळील श्री गजानन महाराज मंदिरात  रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटेच भक्तिमय वातावरणात होणार आहे. सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व आरती होईल. त्यानंतर सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत पवित्र लघुरुद्र अभिषेक (पादुका पूजन) विधी पार पडणार असून हा सोहळा नितीन भावे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत भाविकांसाठी सामूहिक चक्रभ्रमण पारायण आयोजित करण्यात आले आहे. तर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत महाराजांच्या महिम्याचे वर्णन करणारे मंगलमय सत्संग होणार आहे. भक्तांसाठी  महाप्रसाद कार्यक्रम दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आला असून सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *