बोरी नदी पात्रात ३ मे रोजी राबवणार प्लास्टिकमुक्त अभियान; यात्रोत्सवात व्यापक स्वच्छता उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) श्री संत सदगुरू सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त बोरी नदी पात्र स्वच्छ व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्षाच्या वतीने रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ६ वाजता  विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

यात्रोत्सवाच्या कालावधीत सिंगल-यूज प्लास्टिक कॅरी बॅग, कुल्फी-आईस्क्रीमचे रॅपर्स तसेच सौंदर्य प्रसाधनांच्या प्लास्टिक आवरणांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने बोरी नदी पात्र प्रदूषित होते. या पार्श्वभूमीवर नदी परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या अभियानासाठी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, नवनियुक्त संचालक डॉ. प्रवीण महाले, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. राजू गवारे, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. निलेश पाटील, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. विशाल करपे, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा येथील प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. पी. बोरसे, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच. डी. जाधव, सचिव प्रा. डॉ. पराग पाटील, सहसचिव डॉ. मांटे, उपप्राचार्य प्रा. अमृत अग्रवाल, धनदाई कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव देसले, सिनेट सदस्य डॉ. धीरज वैष्णव, डॉ. संदीप नेरकर, विभागीय समन्वयक डॉ. दिलीप गिऱ्हे, डॉ. प्रदीप औजेकर, किसान कला वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. काकासाहेब गायकवाड, डॉ. शशिकांत पाटील, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप राठोड, प्रा. डॉ. हेमंत पवार, डॉ. राजपूत, डॉ. महादेव तोंडे, प्रा. डॉ. सतीश पारधी, प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. अनिता खेडकर, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. पवन पाटील, डॉ. हरेश चौधरी, डॉ. आय. एस. पाटील, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. अनिल महाले, डॉ. सी. आर. पाटील, डॉ. एस. एन. पाटील, महेश माळी, अथर्व करंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच अमळनेर नगर परिषदेतील कर्मचारी, प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे कर्मचारीवृंद, विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, योगा ग्रुप अमळनेरच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बोरी नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून यात्रेकरूंना स्वच्छ व प्रदूषणमुक्त वातावरणात बोरी नदीत यात्रोत्सवाचा मनमुराद आनंद घेता यावा, तसेच निसर्ग संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचविण्याचा उद्देश आहे. निसर्गप्रेमींनी या अभियानात सहभागी होऊन बोरी नदी पात्र स्वच्छतेस हातभार लावावा व निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन उपक्रमाचे समन्वयक व राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा तसेच प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्रा. डॉ. मनीष करंजे यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *