दारूच्या नशेत विष प्राशन; उपचारादरम्यान फापोरे खुर्द येथील युवकाचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी)  दारूच्या नशेत विष प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना तालुक्यातील फापोरे खुर्द येथील पंकज मोतीलाल पाटील यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. २२ मे रोजी सकाळी ८ वाजता फापोरे येथे पंकज मोतीलाल पाटील यांनी विष प्राशन केल्याची माहिती कैलास पाटील यांना त्यांच्या भावाच्या पत्नीने दूरध्वनीद्वारे दिली. यावेळी पंकज मोतीलाल पाटील यांनी स्वतः दारूच्या नशेत विष घेतल्याचे तसेच प्रकृती बिघडत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

दि. ३० रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. यश इतेकर यांनी घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मावसभावाच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे पुढील तपास करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *