राज्यशास्त्र’ विषयातून बहुविद्याशाखीय ज्ञानाची कवाडे खुली होतात : प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव

अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचा परिचय व स्वागत सोहळा कै. शंकरराव राणे सभागृहात ३ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय तुंटे होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ. धिरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. डी. आर. चौधरी, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षाचे प्रमुख डॉ. मुकेश भोळे, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अमित पाटील, ज्ञान संसाधन केंद्राचे प्रमुख प्रा. दिपक पाटील, सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर, डॉ. सुनिल राजपूत, डॉ. राखी घरटे, डॉ. हर्ष नेतकर, प्रा. निर्भय सोनार, प्रा. रुपाली महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी, कर्मयोगी श्रीमंत प्रताप शेठजी आणि पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. डॉ. हर्ष अरुण नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणी महाजन, रुपाली संसारे आणि जोया पिंजारी यांनी स्वागतगीत सादर केले. कावेरी भोई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, परिचय व स्वागत सोहळा हा विद्यार्थ्यांची आणि विषयाची ओळख करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची प्रगती त्यांच्या विषयातील आवडीवर अवलंबून असते. आज प्रत्येक विषय महत्त्वाचा असून एका विषयाचे महत्त्व अधोरेखित करताना इतर विषयांचे महत्त्व कमी होत नाही. आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय शिक्षणाच्या दृष्टीने विविध विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत योगदान दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना आयक्यूए सी  प्रमुख डॉ. मुकेश भोळे यांनी विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची संरचना समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रताप महाविद्यालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर उच्च शिक्षणाची रचना सूक्ष्मपणे समजून घेणे गरजेचे आहे. एनईपी २०२३ अंतर्गत शिक्षणातील ३+२ आणि ४+१ पॅटर्न तसेच प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रमांची रचना विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी. ज्ञानाचा प्रवास निरंतर सुरू ठेवणे आवश्यक असून ऑनर्स व संशोधन पदवीच्या पद्धतीचेही विद्यार्थ्यांनी आकलन करून घ्यावे, असे डॉ. मुकेश भोळे यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय तुंटे यांनी विद्यार्थ्यांसमोर दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. राज्यशास्त्र विभागाची वैभवशाली परंपरा अबाधित राखणे आवश्यक आहे. तसेच जीवनात अपयश आले तरी खचून न जाता ताण-तणावाचा सकारात्मक दृष्टिकोनातून सामना करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ‘मानसिकसूत्र’ जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी १ ते २ या वेळेत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक कौशल्यांचे सादरीकरण केले. डॉ. राखी घरटे आणि प्रा. रुपाली महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी पाटील, लक्ष्मी पाटील, कल्याणी महाजन आदी विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी साकारली. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी साक्षी पाटील, लक्ष्मी पाटील, अमोल अहिरे, मनीष पाटील, गौरव सोनवणे, आकाश अहिरे, तुषार शिरसाठ, समाधान पाटील, योगिता पाटील आणि खुशी पाटील यांनी सांभाळली. आफ्रिन पठाण आणि श्वेता माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर रमा चव्हाण यांनी आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *