फ्रुट सेल सोसायटीच्या चेअरमनपदी भागवत पाटील तर व्हाइस चेअरमनपदी पुरुषोत्तम पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका को. ऑप.फ्रुटसेल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून चेअरमनपदी  पाडळसरे येथील भागवत पाटील तर व्हाइस चेअरमनपदी कंडारी येथील पुरुषोत्तम पाटील यांची बिनविरोध निवड पार पडली.

यावेळी जयेशकुमार काटे, नंदकिशोर नेरकर,प्रताप पाटील, प्रफुल्ल पाटील, श्यामकांत पाटील, युवराज पाटील, मंगलाबाई चौधरी, सुवर्णा पाटील, सुरेश पाटील, हिलाल सैदाणे, ज्ञानेश्वर धनगर हे संचालक उपस्थित होते. फ्रुटसेल सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *