महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; चेतन राजपूत यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे शुक्रवारी, दि. ९ मे रोजी हिंदू सूर्यकुल वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाला अभिवादन करत समाजात एकजुटीचा संदेश दिला.

शहरातील महाराणा प्रताप चौक येथील महाराणा प्रताप यांच्या स्मारकस्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सर्व मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चेतन राजपूत यांचा राजपूत एकता मंचतर्फे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास संजय पुनाजी पाटील, जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, नगरसेवक सचिन पाटील, जितेंद्र ठाकूर, कामगार नेते एल. टी. पाटील यांच्यासह राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, नरेंद्रसिंग ठाकूर, अंबरसिंग पाटील, अनिल पाटील, प्रकाश पाटील, ॲड. दीपेन परमार, विजयसिंग पवार, गोकुळ पाटील, अजयसिंग पाटील, दीपेन राजपूत, ओंकार राजपूत, भरतसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, बापू पाटील, सुनिल पाटील, जयदीप राजपूत, नचिकेत महाले, केदारसिंग राजपूत, विजयसिंग पाटील, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर राजपूत, विलास राजपूत, मुकेश राजपूत, मनोज पाटील, सूरज परदेशी यांच्यासह राजपूत समाजबांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *