
भावसार क्षत्रिय समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी श्री संत सखाराम महाराज भक्त निवास, वाडी चौक येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश सिताराम शेठ भावसार (जव्हार) होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजाचे अध्यक्ष परेश शांतीलाल भावसार यांनी प्रास्ताविकातून समाजाच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रभाकर जोशी, ज्येष्ठ समाजबांधव भावलाल पोपट भावसार, सुभाष यशवंत भावसार, प्रकाश फकीरा भावसार, मनोहर गुरुदास भावसार तसेच पारितोषिक दाते राजेश रघुनाथ करंजे आणि प्रतिभा कृष्णकांत भावसार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण समितीचे चेअरमन प्रा. प्रवीणकुमार रणछोडदास भावसार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश नारायण भावसार यांनी केले.
शिक्षण निधीसाठी उदार देणग्यांची घोषणा
गुणगौरव समारंभात ज्येष्ठ समाजबांधव अॅड. चंद्रकांत गोकुळदासशेठ भावसार यांनी रुपये ११,१११, सुभाष यशवंत सारजे यांनी रुपये १,१११ तर प्रकाश फकीरा भावसार यांनी रुपये २०० शिक्षण निधीसाठी देणगी जाहीर केली. या देणग्यांमुळे समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी मनोहर गुरुदास भावसार यांनी इयत्ता १ ली ते १० वीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रुपये १०१ चे पारितोषिक जाहीर केले. तसेच सुभाष यशवंत सारजे यांनी इयत्ता १ ली ते ४ थीतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रुपये १०१ चे पारितोषिक जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल कार्यकारी मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान
यावेळी पारितोषिक दाते कृष्णकांत वासुदेव शेठ भावसार तसेच प्रा. मनीष रघुनाथ करंजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती, स्पर्धात्मक युगातील आव्हाने आणि यशस्वी भवितव्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष सुरेश सिताराम शेठ भावसार यांच्या वतीने त्यांच्या सुकन्या तथा मनमाड येथील मुख्याध्यापिका वंदनाताई भावसार यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. यानंतर समाजातर्फे तसेच विविध पारितोषिक दात्यांमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिसे व सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पदाधिकाऱ्यांनी घेतले विशेष परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष नंदलाल रतिलाल भावसार, सेक्रेटरी कुंदन गोपीनाथ भावसार, सहसेक्रेटरी निलेश गोकुळ भावसार, खजिनदार रविंद्र प्रभाकर भावसार, कार्यकारी सदस्य शांमकांत मिठाराम भावसार, दीपक तुकाराम भावसार, कृष्णकांत जगन्नाथ भावसार तसेच सागर सुभाष भावसार, निलेश विजय भावसार, लक्ष्मीकांत मणिलाल भावसार आणि हेमंत भावसार (सेवक) यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply